Tuesday 12 May 2020

Astavinayak 5th : Shree Chintamani Ganpati at Theur

Astavinayak 5th : 
Shree Chintamani Ganpati at Theur




The significance of Chintamani Ganapati Temple:

        The Lord Chintamani is the God who brings peace mind. The idol of Lord Chintamani faces east. The Lord’s eyes are precious gems. The Mahadwar or the main gate of the temple is north-facing, and a road connects it to river Mula Muth.
          There are numerous little temples inside the temple complex like Mahadeva temple. Also, there is additionally a Vishnu-Lakshmi temple and a Hanuman temple. So while doing the temple Parikrama, those temples can be equally viewed. Since the legend of Chintamani occurred under a Kadamba tree, therefore, the village of Theur has another name Kadambapur.



          Lord Chintamani is the family deity of Shree Madhwarao Peshwa. Shree Madhwarao spent his last days at the temple and breathed his last while chanting the Lord’s name. Saint Morya Gosavi did severe penance at Theur. Pleased with his penance, Lord Ganesh emerged from the nearby river Mula Muth as two tigers and granted the saint with Siddhi. 


History of the Chintamani Ganapati:
           There is no record of the person who built it. However, devotees believe that it exists since ancient times. Also, Chintamani Ganpati is related to the Saint Morya Gosavi, a staunch devotee of Lord Ganesh. Moreover, his descendants constructed the main temple structure.
Following a hundred years, Madhavrao Peshwa raised the Sabhamandap of the temple. A couple of years prior to the Shikhar (peak), of the temple was blessed in gold. As Peshwas visited these spot frequently, the two 5 metal bell purchased from Europe was one kept in Mahad and another one was kept here.

After the passing of Madhav Rao Peshwa, his wife performed Sati, the beautiful garden in the temple was made in her memory.




  अष्टविनायक पाचवा गणपती : थेऊरचा श्री चिंतामणी | Chintamani Temple, Theur

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा पाचवा गणपती आहे. 








           हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.
           थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.
कपिल मुनींच्याजवळ त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी नावाचे रत्न होते. गणासूर एकदा त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नांच्या साहाय्याने त्यास पंचपक्वानांचे भोजन दिले. हे पाहून गणासूर स्तंभित झाला व त्यास त्या रत्नाचा मोह निर्माण झाला, त्याने कपिलमुनींकडे त्या रत्नाची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार देताच त्याने त्यांच्याकडून ते हिसकावून घेतले. कपिलमुनींनी विनायकाची उपासना केली. विनायक प्रसन्न झाले व गणासुराचे येथे कदंब वृक्षाखाली पारिपत्य केले. कपिल मुनींनी परत मिळालेले रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. त्यामुळे येथे विनायकास चिंतामणी संबोधले जाऊ लागले व या नगरीस कदंबनगर म्हणू लागले.



श्री क्षेत्र चिंतामणीची कथा

          आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.
गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.

श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर  

चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.
चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान







स्थान- ता.हवेली, जि.पुणे
अंतर- थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. थेऊर फाटा ते थेऊर ५, मुंबई १९१ कि.मी


No comments:

Post a Comment