Tuesday 12 May 2020

Astavinayak 6th : Shree Girijatmaja Ganpati at Lenyadri Hills

Astavinayak 6th : 
 Shree Girijatmaja Ganpati at Lenyadri Hills




           Mother of universe, beautiful wife of Lord Shiva Goddess Parvati performed long penance of Shri Ganesh & at last obtained Shree Ganesh as her son. I salute Girija Parvati's son Girijatmaj who stayson mountain Lekhanadri(i.e.Lenyadri)


   The entire temple is carved out of single stone and is facing south. In front of Main Mandir, there is huge Sabhamandap (Hall) which is nearly 53 feet long and 51 feet broad and to your surprise there is not a single pillar in this Sabhamandap. It has 18 small apartments for meditation. Shree Girijatmaj's idol is placed in the middle apartment.
     Sabhamandap of main temple is only 7 feet high. It has six stone pillars with cow, elephant etc. carved on them. From the main temple one can view river flowing and the Junnar town spread near the river.
      Girijatmaja's idol faces east. Parvati consecrated Ganesh idol in the cave wherein she had performed penances.
Idol here is not a separate and distinct one. It has been carved on stone wall of the cave. Previously idol was covered with armour. Now, since the armour is fallen Girijatmaj's idol with neck turned to left side can be seen. As such only one eye of the idol can be seen. 

          Though the caves on Lenyadri are under control of Archeological Dept. of India, adminstration of Ganesh temple is looked after by Temple Trust.
Fort Shivneri, where Chhatrapati Shivaji Maharaj was born is at a distance of 5-6 kms from Lenyadri.
Since the Ganesh idol is attached to the wall one can not circumnavigate Girijatmaj.
.





सहावा गणपती : लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक | Girijatmaj Temple, Lenyadri






अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री. जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत.

          एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरली आहे. लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. जवळपास ३०० पायऱ्या चढून गणपतीच्या दर्शनाला जावे लागते. 
गणेशोत्सवात या ठिकाणी साजरा होणारा विशेष उत्सव म्हणजे देवजन्मकीर्तन सोहळा. गणेश प्रतिष्ठापनेदिवशी सकाळी १० वाजता देवजन्माचे कीर्तन होते. भाविक या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असतात. गोळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे गिरीस्थान आहे. कीर्तन झाल्यानंतर अन्नप्रसादाचे वाटप केले जाते. गणेशोत्सवामध्ये मंदिराच्या गर्भगृहात फुलांची आकर्षक सजावट केली जाते. या काळात परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात.

श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा

गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.






२८ विहार आणि पाण्याची १५ कुंडे
जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्यांचा समूह आहे. यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात मोडतात. या लेण्यांतील मुख्य गणेश लेणीमध्ये कोणत्याही खांबांच्या आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आला आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात २ चैत्यगृहे, २८ विहार, पाण्याची १५ कुंडे आणि ६ शिलालेख आहेत.


No comments:

Post a Comment