Tuesday 12 May 2020

Astavinayak 8th : Shree Mahaganpati at Ranjangaon

Astavinayak 8th :  
Shree Mahaganpati at Ranjangaon
Maharashtra 412209









          This is the eighth temple visited by devotees who set out on the divine Ashtavinayak tour/Darshan. 

             The Ranjangaon Ganpati temple or well know as Mahaganpati of Ranjangaon is located in Shirur Taluka about 51.5 km (via Pune - Ahmednagar Highway - in 1 hr 31 min) from Pune.

         This Temple is very close from highway, The temple mahadwar is showing from highway and the elepont is looking great in the mahadwar


             The idol at Ranjangaon is of Mahaganpati, the most powerful representation of Lord Ganesha. In the events or Ganesh Jayanti days, lots of small shops here for shopping and the sweet Prashad (Pedha) of Lord Ganesha.

          Managanpati is portrayed, seated on a lotus, flanked by his consorts Siddhi (spiritual power) and Riddhi (prosperity). The idol of Lord Ganesha is also named as 'Mahotkat', and it is said that the idol has 10 trunks and 20 hands. Mahaganpati is depicted as having eight, ten or twelve arms. It is after invoking this form of Ganpati that Shiva vanquishedthe demon Tripurasur and so he is also known as Tripurarivade Mahaganpati.

                  It is believed that the place where Lord Shiva invoked Lord Ganesha and defeated Tripurasura is Ranjangaon (the word Ranjan means the delighted one), prior to which it had the name of Manipur.





          

HISTORY

          As indicated by the history the temple was worked in the middle of the ninth and tenth century. Temple has so built that sunbeams fall straightforwardly on Shree Ganesha's idol. Since this temple was en route to war, Shreemant Madhavrao Peshwa used to end here have Mahaganpati's darshan. Madhavrao Peshwa made a room in the storm cellar of the temple to keep the idol of Lord Ganesh. He had built a stone sanctum around this swayambhu or self-radiated idol. In 1790 A.D he gave a genetic appropriate to perform pooja of Mahaganpati to Shri Anyaba Dev. 
         Temple Hall was worked by Sardar Kibe and Owaris (a few little flats raised along the course of encasing mass of the temple) were worked by Sardar Pawar and Shinde. Celebrated recluse Morya Gosavi had exhibited an idol made of five metals to Shri Anyaba Dev. This idol is taken out in the parade on happy days.

Nagarkhana is arranged over the passage door. This Nagarkhana was introduced by Maharashtra's decent Chief Minister Shri Manohar Joshi on third May 1997. The primary temple resembles the temple from Peshwa's period. Temple confronting east has tremendous & lovely passageway entryway.


HOW TO REACH?

Ranjangaon Mahaganpati Ganpati Temple By Road:
Regular buses from Pune Station and Shivaji Nagar are available. While going from the Pune – Nagar highway the route is Pune – Koregaon – then via Shikrapur. Rajangaon is 21.2 km before Shirur. From Pune, Ranjangaon is 51.4 km.

Ranjangaon Mahaganpati Ganpati Temple by Train:
The nearest Railway station to ranjangaon Ganpati is Yevat which is located in and around 29.4 km distance.


Ranjangaon Mahaganpati Ganpati Temple by Air:
Hadapsar Airport is the nearest airport which is at 43.4 km from Ranjangaon.






अष्टविनायक आठवा गणपतीः 

रांजणगांवचा श्री महागणपती 

Shri Kshetra Mahaganpati Mandir, Ranjangaon


अष्टविनायकांपैकी हा आठवा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे.



         अष्टविनायकांपैकी हा आठवा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले व येथे शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्यावेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले.
स्थान- ता. शिरूर जि, पुणे हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे.
अंतर- रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.





         पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती.

श्री क्षेत्र महागणपतीची कथा | आख्यायिका)

आख्यायिकेनुसार ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुराइतका मौल्यवान धातू दिला. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेंव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले.
गणपतीने ब्राम्हणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली. लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकत नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केले नाही. शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेंव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.

श्री महागणपती मंदिर आणि परिसर

हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडी आणि २० हात आहेत. या मूर्तीला 'महोत्कट' म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.
हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.
ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे.









No comments:

Post a Comment